Gudi padwa festival 2021 | गुढी पाडवा 2021

Gudi padawa festival 2021 | गुढी पाडवा 2021

Gudi padwa हा सण प्रत्येक घरतिल लहान थोरांनी नटून नटून गुड्ड्या उभारायचा दिवस,

Gudi padwa festival 2021

भारतीय सण हे आपल्या समृद्ध विशाल परंपरेचे प्रतीक आहे आपण आपले सण खूप मोठ्या उत्साहात साजरे करतो.

हे सण आपल्यामध्ये एकोपा स्नेहभावना वाढवण्यास मदत करतात भारतातील प्रत्येक क्षणाचे आपले धार्मिक महत्त्व पवित्र आणि इतिहास आहे आणि अशा सणान पैकी एक सण म्हणजे गुढीपाडवा.

पाडवा किंवा पाडवो हा शब्द संस्कृत शब्द पाड्वा /पाड्वो पासून आला आहे ज्याचा अर्थ आहे चंद्राच्या वाढत्या कलेचा पहिला दिवस जो संस्कृत मध्ये प्रतिपदा म्हणून ओळखला जातो.

त्या दिवसापासूनच रामाचे नवरात्र सुरू होते ते रामनवमीला संपते हा साडेतीन मुहुर्तापैकी एक मानला जातो गुढी हा ब्रह्मध्वज असून स्वतंत्र अस्मितेचे लक्षण व विजयाचे प्रतीक मानले जाते.

गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठून अभंग स्नान केले जाते. नवीन वस्त्रे परिधान करून बांबूच्या लांब काठीच्या एका टोकाशी तांब्याचा कलश, एक वस्त्र, कडुलिंबाची पाने आणि साखरेचे बत्ताशे लावून पूजा करून घराबाहेर दाराजवळ ही गुढी उभारली जाते.

गुढी भोवती रांगोळी काढली जाते आणि फुले वाहिली जातात नैवेद्यासाठी गोड-धोड बनवले जाते.

Gudi padawa festival 2021

चैत्र महिन्यापासून हिवाळ्याची थंडी कमी होते आणि उन्हाळ्याला सुरुवात होते. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने खाल्ली जातात.

मानवी शरीरासाठी अतिशय लाभदायी आहेत. कडुलिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने शरीराला थंडावा मिळतो. कडुलिंब पित्ताचा नाश करते आणि त्वचेसाठी ही अतिशय लाभदायक असते.

गुढीपाडव्याला अध्यात्मिक महत्व आहे. पोळीचा आकार हा मानवी शरीर प्रतीत करतो. गुढी वरील कलश हा गोलाकार असून तो मानवी मस्तक आणि कळक (बांबू) हा माणसाचे शरीर किंवा पाठीचा कणा दर्शवतो.

आपण गुढी आकाशाच्या दिशेने उभारतो. आपली महत्वकांक्षा आकाशाएवढी उत्तुंग आणि अथांग असावी असा संदेश जणू ही गुढी देत असते.

ही गुढी विजयाचे, केलेल्या तपाच्या सफल्य् चे प्रतीक आहे. गुढीत वापरले जाणारे कडुलिंब, साखरेची माळ आणि रेशमी वस्त्र ही मानवाच्या तीनही ही गरजांची प्रतिके आहेत.

आज आज सामाजिक प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. Gudi padwa गुढीपाडवा हा सण एकात्मतेला, स्नेह वाढविण्याला चालना देणारा आहे. तरी या निमित्ताने सर्व भेदभाव विसरून आपण एक होऊया आणि सामाजिक विकास साधूया.

गुढी स्नेहाची उभारूया मनी,
औचित्य शुभमुहूर्ताचे करुनी
विसरूनी जाऊ दुःख सारे,
स्वागत करूया नववर्षाचे प्रेमभरे

Leave a Reply